घर जाकर कमसे कम दो वक्त की रोटी तो मिलेंगी

शेखलाल शेख
शुक्रवार, 15 मे 2020

इस्पर्श आणि मल्लू म्हणाले की, इमारत साईट चालू असते तेथेच आम्ही पत्रे ठोकून राहतो. मात्र लॉकडाउन होताच आमचे काम थांबले. आम्हाला वाटले, काही दिवसांत ही परिस्थिती बदलेल. त्यामुळे जवळचे पैसे खर्च करून खाण्यापिण्यासाठी वस्तू आणल्या. मात्र, त्या काही दिवसांतच संपल्या. दीड महिन्यापासून उपासमार करत आम्ही दिवस काढत होतो. कित्येक दिवस रात्री आम्ही उपासमार सहन केली. ठेकेदाराने पैसे देणे बंद केले. मग आम्ही जगायचे कसे? खाणार नाही तर पुण्यात कसे राहणार; मग गाड्या नसल्याने आम्ही पायीच निघण्याचा निर्णय केला.

औरंगाबाद: ठेकेदाराने पैसे देणे बंद केले. दीड महिन्यापासून उपासमार सुरू आहे. उपाशीपोटी आणखी किती दिवस काढणार? ‘कमसे कम हमारे घर जाकर दो वक्त की रोटी तो मिलेंगी...’ हे हृदय पिळवटून टाकणारे वाक्य आहे मागील चार दिवसांपासून पुणे ते औरंगाबाद शहरापर्यंत पायपीट करणाऱ्या इस्पर्श साहू आणि मल्लू सोनी या दोन तरुण इमारत बांधकाम कामगार मजुरांचे. त्यांना मध्य प्रदेशात जायचे असून जबलपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर त्यांचे करिंगी नामक गाव आहे. 

इस्पर्श आणि मल्लू म्हणाले की, इमारत साईट चालू असते तेथेच आम्ही पत्रे ठोकून राहतो. मात्र लॉकडाउन होताच आमचे काम थांबले. आम्हाला वाटले, काही दिवसांत ही परिस्थिती बदलेल. त्यामुळे जवळचे पैसे खर्च करून खाण्यापिण्यासाठी वस्तू आणल्या.

हेही वाचाः धक्कादायक स्टील इंडस्ट्रीची वेठबिगारी

मात्र, त्या काही दिवसांतच संपल्या. दीड महिन्यापासून उपासमार करत आम्ही दिवस काढत होतो. कित्येक दिवस रात्री आम्ही उपासमार सहन केली. ठेकेदाराने पैसे देणे बंद केले. मग आम्ही जगायचे कसे? खाणार नाही तर पुण्यात कसे राहणार; मग गाड्या नसल्याने आम्ही पायीच निघण्याचा निर्णय केला. आता कितीही अडचणी आल्या तरी त्याची आम्हाला पर्वा नाही.

मागील चार दिवसांपासून पुण्याहून आम्ही पायी चालत आहोत. उन्हामुळे पायांची आग होतेय. जवळ पाणीसुद्धा नसते. रस्त्यात काहीजण खाण्यासाठी देतात. त्यांनी दिलेले खाऊन आम्ही औरंगाबाद गाठले आहे. आता येथून गाडी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

नाही मिळाली तरी आम्ही गावी पायीच जाणार. औरंगाबादमधून गाड्या मिळतात अशी आम्हाला माहिती मिळाली होती. जळगाव, भुसावळपर्यंत जरी गाडी मिळाली तरी आम्हाला गावाकडे जाण्यासाठी मदत होईल. आता सध्या आम्ही उपाशी आहोत. 

अब घरपरही रहेंगे

आम्ही ज्यांच्या भरवशावर आलो होतो त्यांनी आम्हाला धोका दिला. दीड महिना उपासमारीत काढला. जवळ एक रुपया नाही. आता आम्ही घरीच राहणार. तेथे किमान आम्हाला दोनवेळची भाकर तर मिळेल. उपाशी तर मरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers Return PM village Aurangabad News