esakal | कंगना राणावतच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana_Ranavat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

कंगना राणावतच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रकरण

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळल्यानंतर जी. एस. ए. अन्सारी यांनी ॲड. एस. एस. काझी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पिस्तूल विकायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तीन संशयितांना अटक

अभिनेत्री कंगणा हिने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी नऊ सप्टेंबर रोजी अपमानास्पद अरेरावीची भाषा वापरली होती. त्या विरोधात याचिका दाखल करत मुख्यमंत्री हे महत्त्वाचे पद आहे. त्यांच्याविरोधात असे अपमानास्पद शद्ब वापरणे चुकीचे आहे. हा महाराष्ट्राचा, मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचे याचिकेत म्हटल्याचे ॲड. काझी यांनी सांगितले. अभिनेत्री कंगणा हिचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात यावेत असेही याचिकेत नमूद केल्याचे ॲड. काझी म्हणाले. सदर आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने २२ सप्टेंबर रोजी फेटाळल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे ॲड. काझी म्हणाले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. काझी यांच्यासह ॲड. सय्यद मेहंदी इमाम, ॲड. परवेज दब्बास काम पाहात आहेत.

संपादन - गणेश पिटेकर