esakal | तरुणाने मित्रांच्या मदतीने आपल्याच घरात केली चोरी, औरंगाबादेतील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

आपल्याच घरात एका तरुणाने चोरी करुन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यावर मित्रांबरोबर त्याला अटक करण्यात आली. हा प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे.

तरुणाने मित्रांच्या मदतीने आपल्याच घरात केली चोरी, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद  : आपल्याच घरात एका तरुणाने चोरी करुन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यावर मित्रांबरोबर त्याला अटक करण्यात आली. हा प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. मौजमजा करण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने शहरात मुलानेच स्वतःच्याच घरात मित्रांच्या मदतीने चोरी केली. ही  घटना औरंगाबाद घडली आहे. पुंडलिकनगर ठाण्याच्या पोलिसांनी दिनेश शिंदे, सुमित प्रसाद आणि कृष्णा लखाणे या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही मित्र अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत.

सतीश चव्हाणांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतला, जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

दिनेश शिंदे याने स्वतःच्याच घरात चोरी करुन चोरीचा बनाव केला. त्याने मित्रांसोबत मौजमजासाठी एका टपरी चालकाकडून मित्राच्या मदतीने ६० हजार रुपये उधार घेतले होते. ती परत घेण्यासाठी टपरी चालकाने तगादा लावला होता. यामुळे  दिनेश याने मित्रांच्या मदतीने सोने, चांदी, रोख रक्कमेसह दोन लाखांची आपल्याच घरातून चोरी केली. चोरलेले सोने त्याने मन्नपुरम गोल्डमध्ये ठेवून पैसे ही घेतले. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून चोरीचा बनाव करत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले व दाराचे कुलूप तोडून दिनेश गावी निघून गेला. चोरी झाल्याची घटना घडल्याचा फोन आल्यावर तो आपल्या आईबरोबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता.