नाथांच्या वारकऱ्यांचा दर्ग्यात मुक्काम

सय्यद सादात दर्गा.
सय्यद सादात दर्गा.

औरंगाबाद - पैठण हे गाव सातवाहन राजांमुळे, संत एकनाथांमुळे, पैठणी साडीमुळे आणि जायकवाडीच्या धरणामुळे प्रसिद्ध आहेच; पण पैठणमधला हजरत इद्रीस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा संत एकनाथांच्या काळापासून वारकऱ्यांसाठी हक्काचे आश्रयस्थान बनला आहे. नाथांच्या दर्शनाला येणारे कित्येक वारकरी दर्ग्यातही दर्शनाला येतात. नाथांच्या दिंडीतही गावोगाव मुस्लिम समाज वारकऱ्यांची व्यवस्था करतात.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्याही नाथांच्या पालखीमागे चालण्यासाठी दुरून पैठणला येतात. नाथषष्ठीलाही महाराष्ट्रभरातून सुमारे दहा लाख भाविक पैठणला येतात. या वेळी पैठणच्या मार्गावर ढोरकीनच्या दर्ग्यात एका दिंडीची उतरण्याची सोय केली जाते. ते लोक वारकऱ्यांची सगळी व्यवस्था करतात. पैठणलाही नवनाथ मंदिराजवळ मौलाना दर्गा, सय्यद सादात दर्ग्यात हाच मामला पाहायला मिळतो. ‘‘नाथांचे वारकरी म्हटल्यावर जातिधर्माची सगळी बंधने गळून पडताना आम्ही दरवर्षी पाहतो,’’ असे पालखी सोहळ्याचे मालक रघुनाथबुवा पालखीवाले सांगतात.

कानिफनाथांच्या वास्तव्याची आख्यायिका आणि संत एकनाथ-सय्यद सादात यांच्या दोस्तीच्या कथा पैठणमध्ये सांगितल्या जातात. त्यामुळे नाथषष्ठी यात्रेत दर्ग्यातही मोठी गर्दी होते. पैठणहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीच्या वेळीसुद्धा वारकरी दर्शनाला येतात. तीन दिवस मुक्काम करतात. दिंडीच्या इथल्या मुक्कामात दर्ग्यातच भजन-कीर्तन चालते. नमाजाची वेळ झाली, की वारकरी भजने थांबवितात. आजवर इतक्‍या वर्षांत कधी हिंदू-मुसलमानांत यावरून वाद झालेला नाही.

या विषयावरील सविस्तर रिपोर्ताज वाचा, ‘सकाळ’च्या ‘विठाई’ या आषाढी वारी विशेषांकात. #वारी _सलोख्याची या लिंकवर व्हिडिओही पाहता येईल. गुरुवारपासून (ता. २७) अंक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१५९८८१५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com