अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

भाऊसाहेब गाडे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

कडा (जि. बीड) : दुचाकी - ट्रकचा अपघात होऊन झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 26) येथे घडली. महेश हनुमंत इंगवले (वय १७, रा. मोरेवाडी, ता. आष्टी) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

धडकेनंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला. याबाबत माहिती अशी : परिसरातील मोरेवाडी येथील महेश इंगवले हा १२ वी इयत्तेत शिक्षण घेतो. बुधवारी सकाळी महाविद्यालयात आल्यानंतर रुमवर काही तरी विसरले असल्याचे सांगून त्याने मित्राची दुचाकी (एम. एम. 46 के. 2919) घेऊन निघाला. रस्त्याने जात असताना ट्रकला (एम. एच. 14 बी. जे. 1979) ओव्हरटेक करताना अचानक समोरुन एक दुचाकी आली. यावेळी तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली अडकला. यामध्ये महेश इंगवले जागीच ठार झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

Web Title: 1 student dies in accident