‘या’ जिल्ह्यात २३ हून अधिक संशयितांच्या मदतीला धावली १०८ रुग्णवाहिका 

108
108

परभणी ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय यंत्रणा यासाठी २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवेत १०८ रुग्णवाहिकांचेही योगदान तेवढेच महत्वाचे व अतुलनीय ठरू लागले आहे. परभणीसह जिल्ह्यातील ‘कोरोना’ विषाणू असलेल्या संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात या रुग्णवाहिकांची मोठी मदत वैद्यकीय यंत्रणेस झाल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी सज्ज अशा १३ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या तेराही रुग्णवाहिका २४ तास परभणीकरांना सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे मागील कित्येक वर्षांपासून दिसुन आले आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टर, त्यांचे मदतनीस, चालक हे १०८ क्रमांकावर फोन येताच दिलेल्या ठिकाणी रुग्णास मदत करण्यासाठी तातडीने पोचुन संबंधित रुग्णास रुग्णवाहिकेतील उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करून तातडीने तेथेच उपचार सुरू करण्यात येत असल्याने दवाखान्यापर्यंत पोचण्यास रुग्णास मदत होते. रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना तत्काळ उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचलेले आहेत.

२३ हून अधिक संशयितांना १०८ रुग्णवाहिकेची मदत
सद्यस्थितीत ‘कोरोना’ विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसही संसर्ग होत असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणांकडून होत आहे. जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी कोरोना संशयित रुग्ण असल्यास त्यास तातडीने उपचारार्थ दवाखान्यात आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची मोठी मदत प्रशासनास सद्यस्थितीत होत असल्याचे दिसून आले आहे. २३ हून अधिक संशयितांना १०८ रुग्णवाहिकेची मदत झाली आहे. 

डॉक्टरांसह कर्मचारी, चालकांना ‘पीपीई’ किट्स 
रुग्णवाहिकेतील डॉक्टर, कर्मचारी व चालकांना वेळोवेळी लागणाऱ्या वैद्यकीय साधनसामग्री दिल्या जाते. स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतल्या जाते. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचारी, चालकांना ‘पीपीई’ किट्स देण्यात येत आहेत. यात चेहऱ्याला लावण्यात येणारा मास्क, सर्जिकल गाऊन, डिस्पोजल , हँड ग्लोज, सेफ्टी ग्लोज, वेस्टेज बॅग आदी साहित्यासोबतच हात धुन्यासाठी सॅनिटायझर पुरवल्या जाते. जेणे करून डॉक्टर, कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये, रुग्णास तातडीने उपचार करताना त्यांना संसर्ग होऊ नये, याचीही काळजी घेतल्या जाते.


सर्व यंत्रणा सज्ज 
सर्वच रुग्णवाहिकेतील डॉक्टर, त्यांचे मदतनीस, चालकांनी वेळोवेळी वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. सध्याही ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सज्ज आहे.
डॉ. अंगद बोबडे, जिल्हा समन्वयक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com