येथील भिक्षुक, निराधारांना मिळाले सुखाचे दोन घास, कोणामुळे ते वाचा...  

beghar
beghar

परभणी ः महापालिकेने शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, सरकारी दवाखाना आदी भागांसह परिसरात फिरून ५३ शिक्षक निराधार बेघरांना आधार दिला असून त्यांची रवानगी आता बेघर निवारा केंद्रात करण्यात आली असून तेथे ते सर्वजण सुखाचे दोन घास खात आहेत.

महापालिकेने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, धुरळणी या बाबी तर केल्या जात आहेतच. परंतु, कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शहराच्या विविध भागांत असलेले त्यातही बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर मोठ्या संख्येने असलेले भिकारी, निराधार त्यामध्ये वयोवृद्ध पुरुष, महिला, लहान मुले-मुली अशा ५३ जणांना आरोग्य विभाग, पोलिसांच्या सहकार्याने जमा करून त्यांची रवानगी एका शाळेत निर्माण करण्यात आलेल्या निवारा केंद्रात केली.

अशी केली स्वच्छता
या सर्व भिक्षुक लोकांची अवस्था अतिशय बिकट होती. अंगावरील कपडे फाटके, मळके तसेच केस, दाढी वाढलेली, दुर्गंधदेखील पसरत होता. एका ठिकाणी संकलित केल्यानंतर सुरवातीला त्यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर केशकर्तन, आंघोळ घालण्यात येऊन कपडेदेखील देण्यात आले. अंगावरील असलेल्या दुर्गंधी कपड्यांचीदेखील योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे हे बेघर, भिक्षुक त्यांची अवस्था, स्थिती पूर्णतः बदलली सर्वसामान्यांसारखे ती दिसू लागले आहेत.

चहा, नाश्ता, जेवणाची सोय
महापालिकेच्या ‘एनयूएलएम’ विभागाच्या पुढाकाराने शहराच्या विविध भागांतून जमा करण्यात आलेल्या या भिक्षुक, बेघरांना आता सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणीदेखील करण्यात आली. त्यामध्ये एकालाही कुठलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले नाही. नंतर त्यांची रवानगी बेघर निवारा केंद्रात करण्यात आली. तिथे त्यांना चहा, नाश्ता, जेवण त्याचबरोबर राहण्याचीदेखील सुविधा पुरविण्यात आली. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथे हे निराधार आनंदाने जीवन जगत आहे.

बेघर निवारा केंद्राला भेट
महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक इख्तियार खान पठाण यांच्या पुढाकाराने या निराधारांना अशा परिस्थितीमध्ये आधार देण्याचे काम महापालिकेने केले आहे. महापालिकेचे आयुक्त श्री. पवार यांनी या बेघर निवारा केंद्राला भेट देऊन या मंडळींशी संवाददेखील साधला तसेच त्यांच्या आरोग्याची खबरदारी, काळजी घेण्याचे आदेशदेखील संबंधित यंत्रणेला दिले.

अन्नपाण्यासह आरोग्याचा प्रश्न
काही जणांच्या अन्नपाण्यासह आरोग्याचा प्रश्न मोठा होता. तसेच त्यांना अशा परिस्थितीत सोडणेदेखील शक्य नव्हते. त्यामुळे शहरातील सर्व भागांतील आजच्या भिक्षुक, बेघरांना जमा करून करून त्यांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळेल, आरोग्य नीट राहील याची खबरदारी घेतली जात आहे.
- रमेश पवार, आयुक्त, महापालिका परभणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com