esakal | दहा सप्टेंबरला ड्राय डे नाहीच  
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

गणेशोत्सव, गौरी गणपती सणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ नये यासाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे जाहीर केला होता. या निर्णयाला खंडपीठात आव्हान देण्यात आले असता, खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्याने तसेच यापूर्वी न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे अवलोकन न केल्याने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश जी. घरोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सदर आदेश रद्द केला. 

दहा सप्टेंबरला ड्राय डे नाहीच  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - गणेशोत्सव, गौरी गणपती सणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ नये यासाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे जाहीर केला होता. या निर्णयाला खंडपीठात आव्हान देण्यात आले असता, खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्याने तसेच यापूर्वी न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे अवलोकन न केल्याने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश जी. घरोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सदर आदेश रद्द केला. 

महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे लक्ष्मीकांत कोल्हे यांनी सदर निर्णयाविरोधात ऍड. विक्रम उंदरे यांच्यातर्फे खंडपीठात धाव घेतली होती. 30 व 31 ऑगष्टरोजी पोळा व कर तसेच 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन आणि 10 सप्टेंबरला मोहरम सणामुळे सदर चार दिवस दारु बंदीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता.

सुनावणीदरम्यान ऍड. उंदरे यांनी महाराष्ट्र देशी दारू नियम व महाराष्ट्र विदेश दारु नियम तसेच महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमाचे कलम 142 मधील कायदेशीर तरतुदींना अनुसरुन नसल्याचा युक्तीवाद केला. तसेच त्यांनी यापूर्वीच्या खटल्यांचे दाखलेही दिले. 

loading image
go to top