Pachod News: पाचोड खुर्द येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची औषध प्राशन करून संपवले जीवन

दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
10th standard student end his life drinking poison police pachod
10th standard student end his life drinking poison police pachod Sakal

पाचोड : इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोड खुर्द (ता.पैठण) येथे रविवारी रात्री (ता.२८) उघडकीस आली असून प्रतिक दादासाहेब घुगे (वय १६ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड खुर्द येथील प्रतिक दादासाहेब घुगे (वय १६) हा छत्रपती संभाजीनगर येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपल्याने तो गावी पाचोड खूर्द येथे आला होता. रविवारी (ता. २८) प्रतिक हा सायंकाळी शेतात चाललो म्हणून घरातून निघून गेला.

यावेळी त्याचे वडील दादासाहेब घुगे हे शेतामध्ये नांगरणीचे काम करत होते. बराच वेळ झाला तरी प्रतिकचा कोणताच निरोप न आल्याने तिच्या आईने पतीला फोन करून प्रतिक आल्याची कल्पना दिली. त्यामुळे प्रतिक याने वडीलांकडे न जाता एका झाडाखाली जाऊन विषारी औषध प्राशन केले होते.

प्रतिक हा शेतात आला मात्र तो आपल्याकडे का येत नाही हे पाहण्यासाठी वडील दादासाहेब घुगे त्याच्याकडे गेले असता त्यांना प्रतिकने विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने गावांत फोन करून या घटनेची माहिती दिली व त्यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचारार्थ दाखल केले.

यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीपान काळे यांनी त्याचेवर प्रथोमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.मात्र उपचारा दरम्यान रविवारी रात्री प्रतिक याचे निधन झाले.

प्रतिक हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्या सारखा टोकाचं पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.या घटनेमुळे पाचोडसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी (ता.२९) सकाळी उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात येवून दूपारी शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अण्णासाहेब गव्हाणे करित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com