
जालना : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील छत्रपती फाउंडेशनच्या वतीने प्रथमच बुधवारी (ता. १६) सायंकाळी मुक्तेश्वर लॉन्स येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यात बारा जोडपे विवाहबद्ध झाले. या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक करत फाउंडेशनने असेच उपक्रम यापुढेही राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.