esakal | हिंगोलीत नव्याने बारा जणांना कोरोनाची बाधा, एकाला डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

12 new coronavirus cases In Hingoli

क्वॉरटाइन सेंटर कळमनुरी अंतर्गत एक कोरोना रुग्ण ( बाभळी ) बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिंगोलीत नव्याने बारा जणांना कोरोनाची बाधा, एकाला डिस्चार्ज

sakal_logo
By
राजेंद्र दारव्हेकर

हिंगोली  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १०) बारा जणांना कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  दरम्यान, एक कोरोना रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद यांनी दिली.

शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आयसोलेशन वॉर्ड जिल्हा रुग्णालयाअंतर्गत एक ५५ वर्षीय पुरुष जो नवलगव्हाण गावाचा रहिवासी आहे आणि सारीच्या आजाराने आयसालेशन वॉर्डमध्ये भरती आहे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सदरील रुग्णाला बाहेर गावावरून येण्याचा पूर्वइतिहास नाही. क्वारंटाइन सेंटर कळमनुरी अंतर्गत ( गावपातळी वरील ) दोन व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नवी चिखली येथील तीन वर्षांच्या मुलीसह नांदापूर येथील ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तो मुंबईहून गावी आला होता.

हे वाचा - धक्कादायक ! गेल्या २४ तासात देशात तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

क्वारंटाइन सेंटर वसमत अंतर्गत नऊ नऊ व्यक्तींना कोरोनाचीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील  सात जण सर्व राहणार शुक्रवारपेठ येथील आहेत. वय अनुक्रमे , ८ वर्षीय मुलगा , ११ वर्षीय मुलगा, १२ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगा, ४५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष , ४२ वर्षीय महिला हे सर्व कोरोना  रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत तर दोन ४६ वर्षीय पुरुष रुग्ण स्टेशन रोड आणि सोमवारपेठ येथील आहेत.

दरम्यान, क्वॉरटाइन सेंटर कळमनुरी अंतर्गत एक कोरोना रुग्ण ( बाभळी ) बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजघडीला जिल्ह्यात एकूण ५६ रुग्णांवर उपचार चालू आहेत.