

बदनापूर : बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. पाच) रात्री उशिरा घडली. ज्योती संजय सुरासे (वय १७, रा. किन्होळा, ता. बदनापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस चौकशी करीत आहेत.