esakal | गतवर्षीपेक्षा यंदा जूनपर्यंत १४ टक्‍के अधिक पाऊस, कुठे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

kayadhu

जिल्‍ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. परंतू, काही ठिकाण अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे अतिवृष्टीने शेतशिवाराला तळ्याचे स्‍वरुप आले आहे. तर कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथून वाहनाऱ्या कयाधू नदीला पुर आला होता.

गतवर्षीपेक्षा यंदा जूनपर्यंत १४ टक्‍के अधिक पाऊस, कुठे ते वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्‍वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारपर्यंत (ता.२६) जिल्‍ह्यात वार्षिक सरासरीच्या २० टक्‍के पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी आजपर्यंत ३.४४ टक्‍के पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत १४ टक्‍के पाऊस झाला आहे.

जिल्‍ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. परंतू, काही ठिकाण अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (ता.२६) जुनपर्यंत जिल्‍ह्यात एकूण १७१.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी जूनपर्यंत केवळ ३.४४ मिलीमीटर पाऊस झाला होता. दमदार पावसाच्या हजेरीमुळे जिल्‍ह्यातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. हिंगोली तालुक्‍यात आजपर्यंत १४४.१६, सरासरी १९.४७ मिलीमीटर तर गतवर्षी २५ तर सरासरी २.८६ मिलीमीटर पाऊस झाला.

कळमनुरी तालुक्‍यात आजपर्यंत १३५.१६ मिलीमीटर

कळमनुरी तालुक्‍यात आजपर्यंत १३५.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरी १५. ६९ टक्‍के तर वार्षिक सरासरी ५०.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी तर ५.४९ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव तालुक्‍यात आजपर्यंत १८९.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर वार्षिक सरासरी २३.७ टक्‍के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी १३.६७ मिलीमीटर पाऊस झाला तर टक्‍केवारी १.६३ होती. वसमत तालुक्‍यात आजपर्यंत ११६.४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर वार्षिक सरासरी १३.३८ गतवर्षी २३.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. टक्‍केवारी २.३७ मिलिमीटर औंढा नागनाथ तालुक्‍यात १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली सरासरी २७.९१ टक्‍के आहे. गतवर्षी ४०.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजपर्यंत ८५९.४६ मिलिमीटर पावसाची नोंद 
जिल्‍ह्यात आजपर्यंत ८५९.४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर वार्षिक सरासरी १९.८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाने आजपर्यंत समाधानकारक हजेरी लावली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १४ टक्‍के पाऊस अधिक झाला आहे. परंतू, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसानही झाले आहे. पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्‍हा प्रशासन व कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा - Corona Breaking ; हिंगोलीच्या कोरोनाबाधित तरुणीचा अकोल्यात मृत्यू 

येहळेगाव मंडळात शंभर मिलिमीटर पाऊस
दरम्‍यान, मागील चोवीस तासात शुक्रवारपर्यंत (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्‍ह्यात २८.३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहेत. यात येहळेगाव, गोरेगाव, आजेगाव या मंडळाचा समावेश आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात राष्‍ट्रवादी पडळकर यांच्या वक्‍तव्याविरोधात आक्रमक 

मंडलनिहाय झालेला पाऊस 
हिंगोली मंडळात ४० मिलीमीटर, खांबाळा ५२, माळहिवरा ४४, सिरसम बुद्रूक ३९, बासंबा ३८, नरसी नामदेव १८, डिग्रस ३५ एकूण २६६.० तर सरासरी ३८.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कळमनुरी मंडळात ५० नांदापूर एक, बाळापूर सात, वारंगाफाटा दोन, वाकोडी पाच, डोंगरकडा निरंक एकूण ६५ तर सरासरी १०.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव मंडळात ४०, गोरेगाव ८०, आजेगाव ६७, साखरा २३, पानकनेरगाव २२, हत्ता २५ एकूण २५७ तर सरासरी ४२.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वसमत मंडळात एक, हट्टा २९, गिरगाव, कुरुंदा, आंबा, हयातनगर निरंक. टेभुर्णी ११, औंढा नागनाथ मंडळात ४४, जवळा बाजार चार, येहळेगाव १०० साळणा २८ एकूण १७६.० सरासरी ४४ मिलीमीटर तर जिल्‍ह्यात एकूण सरासरी २८.३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.