gaurav shinde
sakal
- किशोर साळुंके
वैजापूर - पुलावरून जातांना तोल जावून १४ वर्षीय मुलगा होनाई नदीत पडून वाहून गेला. ही घटना सोमवारी (२९) दुपारी तालुक्यातील कविटखेडा येथे घडली. स्थानिकांनी सहा तास शोध घेवूनही पाण्यात पडलेला मुलगा मिळून आलेला नाही. गावातील सहका-यांसह अभ्यास करण्यासाठी तो बोलठाणला गेला होता. तेथून परततांना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.