Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती
Human Trafficking: बीड जिल्ह्यातील गहूखेल (ता. आष्टी) येथून १५ बालकामगारांची सुटका करण्यात आली असून दलालाकडून पैसे घेऊन मुलं पाठवण्यात आल्याचा संशय आहे. पोलिस तपासात बाल तस्करीच्या संकेतांचीही शक्यता आहे.
बीड : गहूखेल (ता. आष्टी) येथील सेवालाल तांडा येथील विविध घरांत आणि जनावरांच्या गोठ्यात काम करत असलेल्या पंधरा बालकामगारांची नुकतीच सुटका करण्यात आली. आता या प्रकरणात गंभीर माहिती समोर आली आहे.