Bhokardan Crime: तुळजापूरला जायला दुचाकी मिळाली नाही, घरच्यांनीही थांबवलं, पण..; १६ वर्षीय मुलानं घेतला धक्कादायक निर्णय!

Bhokardan News: भोकरदन तालुक्यातील लेहा गावात तुळजापूरला जाऊ न दिल्याच्या कारणावरून सोळा वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Bhokardan Crime

Bhokardan Crime

sakal

Updated on

कैलास दांडगे

- भोकरदन तालुक्यातील लेहा गावातील घटना-

पारध, ता 28 : तुळजापूरला दर्शनासाठी दुचाकीने घरच्यांनी जाऊ दिले नाही,म्हणून एका सोळा वर्षीय शालेय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 27) लेहा (ता. भोकरदन) या गावांत उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याविषयी माहिती अशी की, लेहा येथील नैतिक सदाशिव सोनवणे (वय 16 वर्ष) हा लेहा गावाजवळ असलेल्या एका खाजगी शाळेत दहावीचे शिक्षण घेत होता. नैतिक मागील काही दिवसांपासून त्याने व त्याच्या मित्रांनी दुचाकीने तुळजापूरला दर्शनासाठी जाण्याचा बेत केला होता. नैतिकने याबाबत अगोदर आपल्या आई-वाडीलाला कळवले, मात्र दोघांनीही जाण्यास नकार दिला, तरी ही नैतिक घरी वारंवार तगादा लावून धरला होता, मात्र आई-वडील त्याला परवानगी देत नव्हते व याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे , व आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्यापासून दूर करण्यासाठी त्या माय माऊलीची हिम्मत होत नव्हती त्यामुळे ती त्याला स्पष्ट शब्दात नकार देत होती,पाऊस उघडल्यावर आपण सर्वजण सोबत जाऊ,असेही आईने त्याला सांगितले, मात्र नैतिक हा आपल्या मित्रांसोबत तुळजापुरला दर्शनासाठी जाण्यासाठी हट्ट धरून बसला होता. शेवटी आई-वडिलांनी त्याला जाण्यास नकार दिल्याने नैतिकचा संयम तुटला आणी शनिवारी (ता. 27 ) आई शेतात भुईमुगाच्या शेंगा तोडण्याचे काम करीत होती तर वडीलही कामात होते. त्याचे आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते,त्याच वेळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आजोबा घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्या वेळी नैतिकने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला नातेवाइकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ही बाब त्याच्या शेतात राबणाऱ्या आई-वडिलांच्या कानावर गेली आई वडील धावतच आपल्या घरी आले व त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, आई-वडिलांनी मोठमोठ्याने टाहो फोडला बाळा तुझ्या काळजीसाठीच नाही जाऊ देत होते रे मी असे म्हणत आईने हंबरडा फोडला, आपला एकलुता एक मुलगा आता आपल्याला कायमचा सोडून गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. याबाबत पारध पोलिस ठाण्यात अद्याप काहीच नोंद नसल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com