Ashadhi Wari 2025 : विठ्ठलनामाचा गजर अन् सायकलवारीला लातुरातून भक्तांची भव्य सुरुवात!

Cycle Ringan : लातूरमधील १७५ सायकलस्वारांची ‘वारी’ पंढरपूरकडे रवाना झाली असून यंदाच्या सायकल रिंगण सोहळ्याचे यजमानपद ‘लातूर सायकलिस्ट क्लब’कडे आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी भक्तिभावाने सायकलवारीला सुरुवात केली.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025 sakal
Updated on: 

लातूर : पंढरपूर येथील सायकल रिंगण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लातूरमधील १७५ जणांची ‘सायकलवारी’ शुक्रवारी (ता. २०) भल्यापहाटे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्याआधी टाळ-मृदंगाच्या निनादात, भगवी पताका उंचावत अन्‌ विठ्ठलनामाचा जयघोष करीत अतिशय भक्तिमय वातावरणात पांडुरंगाची आरती करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com