18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर) 

यादवकुमार शिंदे
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पटलादेवी मध्यप्रदेश येथील शुभमसिंग समरसिंग यांनी ही काळ्या रंगाची घोडी लक्ष्मी नाव असलेली घोडी सारंगखेडा येथील यंदाच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये विक्रीसाठी आणली होती. वय 18 वर्षे असलेल्या या घोडीची किंमत 5 लाख 51 हजार रुपये आहे. 

औरंगाबाद : धुळे जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल मधील तब्बल 5 लाख 51 हजार रुपयांची सर्वात महाग ठरलेली "लक्ष्मी' घोडी यंदाच्या फेस्टिव्हलचे आकर्षण ठरत आहे. ही महागाची घोडी औरंगाबाद जिल्ह्यातील वरखेडीखुर्द (ता.सोयगाव) नितेशसिंग राजपूत यांनी 5 लाख 51 हजार रुपयात खरेदी केली. ही घोडी परीसरात चर्चेचा विषय ठरली असून नागरीक मोठ्या प्रमाणात ही घोडी बघण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहे. 

हेही वाचा- खाऊच्या आमिष दाखवून चिमुकलीला नेले, अन नराधमाने.... 

ही आहे घोडीचे विशेषता 
पटलादेवी मध्यप्रदेश येथील शुभमसिंग समरसिंग यांनी ही काळ्या रंगाची घोडी लक्ष्मी नाव असलेली घोडी सारंगखेडा येथील यंदाच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये विक्रीसाठी आणली होती, मारवाडी पंचकल्याण जातीच्या या घोडीला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सारंगखेडा फेस्टीव्हलमध्ये असणाऱ्या घोड्यांमध्ये देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, व काळा पंचकल्याणी या गुणवान जातीच्या घोड्यांना मोठी मागणी असते, यापैकीच मारवाडी पंचकल्याणी जातीची ही काळ्या रंगाची लक्ष्मी घोडी असल्याने आपण तिची 5 लाख 51 हजार रुपय इतकी सर्वात जास्त किमंत देऊन खरेदी केली असल्याचे ही नितेशसिंग राजपूत यांनी सांगितले. 

क्लिक करा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम 

वय 18 महिने, भाव पाच लाख 51 हजार 
नितेशसिंग राजपूत यांनी सांगितले की, ही घोडी आपणास बघता क्षणीच आवडली. या घोडीचे वय 18 महिने आहे. लक्ष्मीच्या खुराकाला महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च होतो आहे. 5 लाख 51 हजार रुपये किमंतीची ही लक्ष्मी घोडी शुक्रवारी (ता.20) पहाटे सोयगाव तालुक्‍यातील वरखेडीखुर्द येथे दाखल झाली.

हे वाचलंत का?-...तर नगरसेवकांना निष्क्रीयता भोवणार (वाचा नेमकं कुठलं प्रकरण) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 Months Female Horse Price Five Lack Fifty Thousand, Sarangkheda Chetak Festival