esakal | जिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोना’ संक्रमित रुग्ण दगावण्याची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने अनेकांना ‘गड्या आपला देशच बरा’ म्हण्याची वेळ आली. या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरीक अमेरिका, जर्मनी, फ्रांस, रशिया, सौदी अरेबिया, आस्ट्रेलिया, जार्जिंया, इजिप्त, इंडोनेशिया या नऊ देशात वास्तव्यास होते. ‘कोरोना’च्या भितीने हे सर्वच्या सर्व १८१ नागरीक  लॉकडाऊनपूर्वीच जिल्ह्यात माघारी परतले आहेत

जिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’ व्हायरसची सुरुवात चिनमध्ये झाली. हा व्हायरस इतक्या वेगाने पसरेल असे कुणालाही वाटले नव्हते. इतर फ्लु प्रमाणेच हा आजारसुद्धा जाईल असेच सर्वांनी काहीसे गृहीत धरले होते. नेमकी हिच चुक कोरोनाची लागण झालेल्या बहुतेक देश व तेथील नागरीकांच्या अंगलट आल्याचे दिसून येते.   

इतर देशात ‘कोरोना’ आजाराचा फैलाव गतीने होण्यास सुरुवात झाली.  आणि ‘कोरोना’ संक्रमित रुग्ण दगावण्याची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने अनेकांना ‘गड्या आपला देशच बरा’ म्हण्याची वेळ आली. या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरीक अमेरिका, जर्मनी, फ्रांस, रशिया, सौदी अरेबिया, आस्ट्रेलिया, जार्जिंया, इजिप्त, इंडोनेशिया या नऊ देशात वास्तव्यास होते. ‘कोरोना’च्या भितीने हे सर्वच्या सर्व १८१ नागरीक  लॉकडाऊनपूर्वीच जिल्ह्यात माघारी परतले आहेत. त्या सर्व संशयितांचे स्वॅब सॅम्पल पुणे येथील ‘एनआयव्ही’ विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
   
हेही वाचा- लोकप्रतिनिधींनी दिले चार कोटी

घरोघरी जाऊन सर्वेक्षण
कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरम्यान ६६ हजार ८८१ प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. 

लॉकडाऊन दरम्यान नांदेड जिल्ह्यात एक दोन नव्हे तर चक्क १८१ लोक विविध देशातुन भारतात परत आले आहेत. या सर्वांंच्या लाळेंचे स्वॅब घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले होते. सुदैवाने त्यामधील एकाही व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यात दिल्ली येथील निजामुद्दिन येथील मरकडमध्ये सहभागी झालेल्या १६ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचे देखील स्वॅब तपासणी करण्यात आले होते ते स्वॅब देखील निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत.

हेही वाचले पाहिजे- लातूरचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणतात, बिनधास्त वाचा वृत्तपत्र !

तालुका निहाय तपासणी करण्यात आलेल्या संशयितांचे आकडेवारी
- अर्धापूर- २२०३
- भोकर- २०३४
- बिलोली- ४१९१
- देगलुर- ६६३२
- धर्माबाद- १३९९
- हदगाव- ४५३९
- हिमायतनगर- १७४५
- कंधार- ९०२५
- किनवट- २४४५
-लोहा- ४७३८
- माहुर- ३१६३
- मुदखेड- १५७१
- नायगाव- ५८६९
- नांदेड- २२३८
- उमरी- १७९२
- महापालीका क्षेत्र- ४००५ 
अशी एकुण ६६ हजार ८८१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
 

loading image