killari Earthquake: सर्वस्व गमवूनही किल्लारीकर पुन्हा उभा; परस्परांना साहाय्य करत शेती अन् व्यवसायाची उभारणी, गावांनीही कात टाकली
killari Earthquake 1993: ३० सप्टेंबर १९९३ चा लातूर भूकंप धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील ५२ गावांना उद्ध्वस्त करणारा ठरला. तत्कालीन सरकारने तत्काळ मदत पोहोचवून लोकांना पुन्हा जीवनाच्या प्रवाहात आणले.
औसा (जि. लातूर) : ३० सप्टेंबर १९९३च्या रात्री गणरायाला निरोप देऊन साखरझोपेत असलेल्या लोकांना उद्याची सकाळ आपण पाहणार नाही, याची पुसटशीही कल्पना नव्हती. सगळीकडे दगडमातीच्या भिंती आणि माळवदाचे छप्पर.