
वैजापूर : समृद्धी महामार्गावर कार अज्ञात वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार; तर चौघे जखमी झाले. ही घटना घायगाव शिवारात (ता. वैजापूर) मंगळवारी (ता. १३) सकाळी सातला घडली. पूनम अजयसिंह चौव्हाण (वय २८, रा. सराय, ता. मढियाहू, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश), देवानंद मुन्शीलाल चौव्हाण (वय २१, रा. पाथरी फाटा, नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. अजयसिंह चौव्हान (वय ३५), नॅन्सी अजय चौव्हान (८), अनन्या अजयसिंह चौव्हान (५) व प्रियांशी अजयसिंह चौव्हान (वय ८ महिने, सर्व रा. सराय, ता. मढियाहू, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश, ह.मु. गोवा) अशी जखमींची नावे आहेत.