बीड : चौसाळ्याजवळ अपघात दोन तरुण जागीच ठार

अमोल तांदळे
शनिवार, 18 मे 2019

चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा. चांदेगाव, ता. बीड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

सतिश मोरे व धनंजय कोल्हे हे दोघे शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच. २३ आर. ६४०) बीडकडून चौसाळ्याकडे जात होते. तर, स्कॉर्पिओ जीप (क्रमांक एम. एच. २३  ए. डी. ४४६२) चौसाळ्याकडून बीडकडे जात होती. चौसाळा येथील बाह्यवळण रस्त्याच्या महात्मा बसवेश्वर चौकाजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ जीपची समोरा - समोर धडक झाली. अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही वाहने घटनेनंतर रस्त्याच्या खाली आली. दरम्यान, चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (ता. १८) वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे व डॉ. अंकुश मंचुके यांनी उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर दोघांवरही अंत्यसंस्कार झाले.

सतीशचा दिड महिन्यांपूर्वीच विवाह
सतीश मोरे याचा दिड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई - वडील, एक भाऊ, बहिणी आहेत. तर धनंजय कोल्हे याच्या पश्चात आई - वडील, भाऊ असा परिवार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 dies in accident near Beed