Sugar IndustrySakal
मराठवाडा
Sugar Industry : साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर; यंदा विभागात ७० लाख टन उसाचे गाळप, ५४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती
Maharashtra Sugar Mills : छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ६९.८५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत सहा जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह खान्देशातील जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातील २२ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात सात कारखाने गाळप करीत आहेत.

