esakal | हिंगोलीत रविवारी रात्री २३ जणांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती कोरोना केअर सेंटर्स ईन्चार्ज वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी (ता. १९ ) रात्री नऊ   वाजता दिली आहे. 

हिंगोलीत रविवारी रात्री २३ जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : रविवारी (ता. १९) रात्री प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हांतर्गत नव्याने २३ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती कोरोना केअर सेंटर्स ईन्चार्ज वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी (ता. १९ ) रात्री नऊ   वाजता दिली आहे. 

त्यांच्या माहितीनुसार ३४ वर्षीय, ३४ व ३८ वर्षीय स्त्री हिंगोली येथील खडकपुरा भागातील  कोरोना रुग्णाच्या जवळच्या २१ वर्षीय स्त्री, १५, १० व ४ वर्षाची मुलगी संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच तलाबकट्टा येथील ६० वर्षे स्त्री, ३० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय स्त्री कोरोना रुग्णाच्या जवळच्या १२, ३७ पुरुष ११ मुलगी संपर्कातील व्यक्ती आहेत. 

औरंगाबाद व मध्यप्रदेश प्रवास

सेनगाव येथील बालाजी नगर भागातील २५, २९ वर्षीय पुरूष ३५ वर्षीय स्त्री कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तर सेनगाव येथील  १६ वर्षीय पुरुष कोरोना रुग्णाच्या जवळच्या समतानगर संपर्कातील व्यक्ती आहे. तसेच १७, ४१ पुरुष स्वानंद कॉलनी, आय.एल.आय ( ताप , सर्दी , वसमत खोकला ) असल्यामुळे कोविड तपासणी करण्यात आली आहे.  बाळापुर येथील ५० वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय स्त्री व १४ वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या जवळच्या  संपर्कातील व्यक्ती आहेत. २४ व २३ वर्षीय पुरुष कळमनुरी तालुक्यातील  कांडली येथील आहेत. ते  औरंगाबाद व मध्यप्रदेश येथून कळमनुरी आलेले आहेत. तर रेडगाव येथील ३० वर्षीय पुरुष पुणे येथून आला आहे. 

रविवारी रोजी ११ कोरोना रुग्ण बरे 

रविवारी रोजी ११ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ४ कोरोना रुग्ण यात  ( २ दौडगाव , १ तलाब कट्टा , १ गांधी चौक ) बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ७ कोरोना रुग्ण यात ( ४ कळमकोंडा , १ तलाबकट्टा , १ भांडेगाव , १ हनवतखेडा ) बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
आजपर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ४१० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३१० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १०० रुग्णांवर उपचार चालु आहेत. कोरोना केअर सेंटर औंढा येथे १ कोरोना रुग्ण ( अंजनवाडी ) उपचारासाठी भरती आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे २७ कोरोना रुग्ण

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे २७ कोरोना रुग्ण १ रिसाला १ जि.एम.सी.नांदेड ( आझम कॉलनी ) , १ धुत औरंगाबाद ( ब्राम्हण गल्ली वसमत ) , १ पेडगाव , ८ शुक्रवार पेठ , १ नवलगव्हाण , २ तलाबकट्टा , १ गवळीपुरा , १ पेन्शनपुरा , १ अंजनवाडी , २ सेनगाव , १ जयपुरवाडी , १ नवा मोंढा , १ कासारवाडा , १ आझम कॉलनी , १ पलटन , १ नारायण नगर , १ अशोक नगर )  , डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २२ कोरोना रुग्ण आहेत यात ( १ वापटी , ७ शुक्रवार पेठ , ३ स्टेशन रोड , १ सोमवार पेठ , ५ सम्राट नगर , १ गणेशपेठ , १ पारडी , १ गुलशन नगर ( नांदेड येथे संदर्भात ) , १ बहिर्जी नगर , १ स्वानंद कॉलनी ( नांदेड येथे संदर्भात ) ) येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे. 

हेही वाचा - नांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर

कळमनुरी येथे एकुण १० कोरोना रुग्ण

कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुण १० कोरोना रुग्ण आहे यात ( ३ नवी चिखली , १ नांदापुर , ३ आखाडा बाळापुर , २ कांडली , १ रेडगांव ) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत .  कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ३४ कोरोनाचे  रुग्ण आहेत यात  ( १४ पेडगाव , ५ रामादेऊळगाव , २ पहेणी , १ माळधामणी , ५ तलाब कट्टा , ७ खडकपुरा ) उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ६ कोरोनाचे रुग्ण आहेत यात  ( २ बस स्टॅन्ड जवळ सेनगाव , ३ बालाजी नगर , १ वार्ड नं .१० समता नगर , सेनगाव ) उपचारासाठी भरती आहे . 

सद्यस्थितीला ८९१ व्यक्ती भरती आहेत 

हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुण ६३८४ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५७४४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ५४७६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ८९१ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २८९ अहवाल येणे व थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय येथे भरती असलेल्या कोरोना  रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे