23800 Cusecs Released from Yeldari Dam
sakal
जिंतूर - गेल्या काही दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीपात्रात बांधण्यात आलेले येलदरी धरण ओसंडून वाहत असून मागील महिन्यापासून (१५ ऑगस्ट) धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रात कधी दोन, कधी चार, सहा दरवाज्यामधून आता पर्यंत पूर नियंत्रणासाठी पाणी सोडावे लागले याच महिन्यात (१८ ऑगस्ट) धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले होते.त्यानंतर आज (१६ सप्टें) पुन्हा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले.