esakal | सिद्धी शुगर्स कारखान्याला 2.42 कोटींचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

siddi shugar

सिद्धी शुगर्स कारखान्याला 2.42 कोटींचा गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर: उजना ( ता. अहमदपूर ) येथील सिद्धी शुगर अँड आलाईड लिमिटेड कारखान्याची दोन कोटी 72 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चेन्नई येथील कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालका विरोधात शुक्रवारी ( ता.3)  गुन्हा नोंद झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणा प्रमाणे प्रत्येक साखर कारखान्यास त्यांनी उत्पादित केलेल्या साखरे मधून काही साखर निर्यात करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: भीक मागण्यासाठी चिमुकल्यांची विक्री; ‘ती’ बालके देऊळगाव महीतील

त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोट्यातील कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरे पैकी दोन हजार 607 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी कुरिंजी प्रोन्याचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, चेन्नई यांचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख (रा.अहमदनगर) यांच्यामार्फत कंपनीसोबत करार केला होता. त्याप्रमाणे या कंपनीने दोन हजार 607 मेट्रिक टन साखर कारखान्यांमधून साखर निर्यात करण्यासाठी नेली होती.

साखर निर्यात केल्यानंतर 90 दिवसात ही साखर निर्यात केल्या बाबतचे कागदोपत्री पुरावे सादर करणे आवश्यक होते. पण, सदरचे कागदपत्र साखर कारखान्यास दिलेले नाही. कारखाना प्रशासनाने वेळोवेळी सदर कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली तेव्हा सदरचे कागदपत्र देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे साखर कारखान्याचे दोन कोटी 72 लाख 43 हजार एकशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: लोहारा: मानधनासाठी किर्तनकार, कलावंताचा आंदोलन

या कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीप राज,कंपनीचे संचालक प्रदीप कालादास गायत्री व कंपनीचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख व सदर कंपनीचे इतर जबाबदार पदाधिकारी  यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे. कारखान्याकडून निर्यातीची साखर कमी दरात खरेदी करून साखर निर्यात करतो असे भासवून स्थानिक बाजारात त्या साखरेची चढ्या भावाने विक्री करून विश्वास घात केला आहे.

यात कारखान्याचे दोन कोटी 72 लाख 43 हजार एकशे पन्नास रूपयांचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली. या संदर्भात फिर्याद कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण पाटील यांनी किनगाव पोलीस स्टेशन येथे दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक आर.एस.जाधव करीत आहेत.

loading image
go to top