Beed News : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाऱ्यावर? हेल्मेटशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना २.६ लाखांचा दंड!
Traffic Rules : बीड जिल्ह्यात हेल्मेट न घालणाऱ्या २६१ शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करत प्रत्येकी १ हजाराचा दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही दुर्लक्ष केल्याने ही कार्यवाही झाली.
बीड : नागरिकांना सक्ती करण्याआधी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अगोदर हेल्मेट वापरावे, असे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चार दिवसांपूर्वी दिले. मात्र, या आदेशाकडे केलेला कानाडोळा करणे कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड देणारे ठरले.