चांडोळ - ईरला येथील धामना नदीच्या पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्यामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या धाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.