कुऱ्हाडीचा घाव घालून 35 वर्षीय युवकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ax wound

Murder Case : कुऱ्हाडीचा घाव घालून 35 वर्षीय युवकाचा खून

शेंदूरवादा - औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गा इसारवाडी फाटा (ता. गंगापूर) येथे भर रहदारीच्या रोडवर एका 35 वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 29) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.

गंगापूर तालुक्यातील सारंगपूर येथील जावई नंदू खिल्लारे यांचा अविवाहित भाऊ बाबासाहेब छबुराव खिल्लारे हे गेल्या 15 दिवसापासून राष्ट्रीय महामार्गा लगत ज्वारीचा हुरडा विक्री करत होते.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक अनोळखी माथेफिरू कुऱ्हाड फिरवीत आला आणि काही बोलायच्या आत त्याच्या बाबासाहेब खिल्लारे याच्या मानिवर डोक्यावर सपासप कुऱ्हाडीचे वार करून ठार केले. मयताच्या एका हाताला प्लास्टर झाला होता. त्याला प्रतिकार करता आला नाही. तो आजारी असल्याने पळू शकला नाही. त्यामुळे त्याचा भर दिवसा भर रस्त्यातच खून झाला.

घटनास्थळी वाळूज पोलीस स्टेशन चे पोलीस तातडीने पोहचले. त्यांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. रुग्णवाहिका बोलवून मृतदेह शवविच्छेदन करिता नेले. घटनास्थळी मृताचे भाऊ, भावजई, आई हंबरडा फोडून रडत होते. या घटनेच्या स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून, घटनेचा कसून तपास करत आहे.

टॅग्स :crimemurderattackYouth