Bird Flu : कोंबड्यांची चार हजार पिले दगावली; ढाळेगाव येथील आठ दिवसांतील घटना, शेडची पाहणी
Poultry Farm : ढाळेगाव येथील आठ दिवसांमध्ये ४,२५४ कोंबड्यांची पिले दगावली आहेत, ज्यामुळे बर्ड फ्लूचे संकेत समोर आले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २३) शेडची पाहणी केली आहे.
अहमदपूर : जिल्ह्यात बर्ड फ्लूचे संकेत असताना तालुक्यातील ढाळेगाव येथे गेली आठवडाभरात ४ हजार २५४ कोंबड्यांची पिले दगावली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली.