esakal | परभणीत लोकप्रतिनिधीच्या वर्चस्वाची आज परीक्षा, ४९८ ग्रामपंचायतीचा होणार फैसला 
sakal

बोलून बातमी शोधा

1Gr

परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीपैकी ४९८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. परंतू, बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशिने लढल्या गेल्या. या निवडणूकांमध्ये प्रत्यक्षरीत्या पक्षाचे उमेदवार नसले तरी बहुतांश निवडणूका या विविध पक्षीय लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातात.

परभणीत लोकप्रतिनिधीच्या वर्चस्वाची आज परीक्षा, ४९८ ग्रामपंचायतीचा होणार फैसला 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा फैसला सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार असता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे गावागावरचे वर्चस्व किती ? हे देखील या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीपैकी ४९८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. परंतू, बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशिने लढल्या गेल्या. या निवडणूकांमध्ये प्रत्यक्षरीत्या पक्षाचे उमेदवार नसले तरी बहुतांश निवडणूका या विविध पक्षीय लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातात. जिल्ह्यातही अनेक मोठ्या ग्रामपंचायती असून आपआपल्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी विद्यामान लोकप्रतिनिधीसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी देखील कंबर कसली होती. आजी-माजी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य देखील आपल्या गावासह गट व गणात वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील होते. विद्यमान बहुतांश विधानसभा, विधान परिषद सदस्य देखील या निवडणूकीत उतरले होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भारतीय जनता पक्षासह अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनी आपआपल्या नेते-कार्यकर्त्यांना त्यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे अनेक गावांमध्ये दोन तीन, चार पॅनल निवडणूकीच्या रिंगणात होते. 


हेही वाचा - हिंगोली : गुंज येथे मतदान केंद्रावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण, प्रतिष्ठितांसह १२ जणांवर गुन्हा

लोकप्रतिनधींच्या वर्चस्वाची लढाई 
आपल्या गट, गण व विधानसभा मतदारसंघात वर्चस्व ऱाखण्यासाठी सदस्यांनी अनेक गावे पिंजून काढली होती. निवडणूका बिनविरोध व्हाव्यात म्हणून देखील प्रयत्न केले. परंतू, जिथे जमले नाही तिथे शह-काटशहाचे राजकारण देखील रंगले होते. रात्रीच्या खेळ्यांना उत आला होता. शहरातील लोकप्रतिनिधींच्या संपर्क कार्यालयात ग्रामीण भागातील कार्यकर्यांचा राबता होता. नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार गावखेळ्या खेळल्या जात होत्या. एका-एका मतासाठी प्रयत्न केल्या जात होते. थेट पुणे-मुंबई येथून देखील मतदारांना आणण्यासाठी अनेकांनी व्यवस्था केली होती. आपल्या पॅनॉल व उमेदवारांना पाठबळाबरोबर आवश्यक ती रसदही काही ठिकाणी पुरवण्यात आली होती.आपल्या गट-गण व विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, ग्रामपंचायतवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. त्यामुळे ही निवडणूक ग्रामसदस्यांच्याच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाची लढाई होती. 

हेही वाचा - हिंगोली : येळी येथे निवडणूक कारणावरुन दोन गटात मारहाण, परस्परविरुद्ध गुन्हा दाखल

१२ हजारावर उमेदवारांचा आज फैसला 
जिल्ह्यात ४९८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. त्यामध्ये परभणी तालुक्यातील (७९), सेलू (५५), जिंतुर (९०), पाथरी (३८), मानवत (३९). सोनपेठ (३४), पालम (६०), गंगाखेड (४५) व पूर्णा तालुक्यातील (५८) ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातील बारा हजारावर उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी (ता.१८) होणार आहे. 


संपादन ः राजन मंगरुळकर

loading image