esakal | वसमत येथे ५० खाटांचा विलगीकरण कक्ष

बोलून बातमी शोधा

korona

कोरोना ग्रस्त किंवा संशयितांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीअंती शहरातील लोकांपासून दूर ठेवण्यासाठी परभणी रोडवरील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहात ५० बेडचा विलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

वसमत येथे ५० खाटांचा विलगीकरण कक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत (जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजनांसंदर्भात आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. खबरदारीचा भाग म्हणून कोरोनाग्रस्त किंवा संशयितांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीअंती शहरातील लोकांपासून दूर ठेवण्यासाठी परभणी रोडवरील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहात ५० बेडचा विलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष उभारण्यात आल्याची माहिती तालुका टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) दिली.

या कक्षाची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी चिलकेवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, महिला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण या मुख्य डॉक्टरांसह १५ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, मंडळ अधिकारी पी. आर. काळे, सुरेश बोबडे हे प्रशासनाकडून काम पाहणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचाहिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जनधन योजनेतील लाभार्थींच्या खात्यावर रक्कम

वसमत : प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यावर तीन महिन्यांची १५०० रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जून) प्रतिमहिना रुपये पाचशे इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा करण्यात येणार आहे.

वेळापत्रक आखून दिले 

यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम (ता. दोन) सर्व संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ साथीमुळे बँक शाखांमध्ये व ग्राहक सेवा केंद्रांत गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.तीन) ज्या खाते क्रमांकांचा शेवट शून्य किंवा एक ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.

येथे क्लिक कराकळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्‍थापना

ठरवून दिलेल्या तारखेलाच बॅंकेत जावे

 दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.चार) खाते क्रमांकांचा शेवट दोन किंवा तीनने सुरू होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. रविवारी (ता.पाच) व सोमवारी महावीर जयंतीची सुटी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील. मंगळवारी (ता. सात) खाते क्रमांकांचा शेवट चार किंवा पाचने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. बुधवारी (ता.आठ) ज्या खाते क्रमांकांचा शेवट सहा किंवा सातने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. गुरुवारी (ता.नऊ) खाते क्रमांकांचा शेवट आठ किंवा नऊने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. गर्दी न करता ठरवून दिलेल्या तारखेलाच बॅंकेत जावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे.