Covid-19 : हिंगोलीला पुन्हा हादरा, दिवसभरात ५० नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

तब्बल 44 रुग्णाची भर पडली. आता एकूण कोरोना बधितांची संख्या 151 झाली असून, यातील 89 रुग्ण यापूर्वीच कोरोना मुक्त झालेत. सध्या 62 रुग्ण उपचार घेत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच शनिवारी (ता. 23) पुन्हा कोरोनाकंप झाला. सकाळी मुंबईवरून आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा तब्बल 44 रुग्णाची भर पडली. आता एकूण कोरोना बधितांची संख्या 151 झाली असून, यातील 89 रुग्ण यापूर्वीच कोरोना मुक्त झालेत. सध्या 62 रुग्ण उपचार घेत आहेत.

यामध्ये शनिवारी सकाळी मुंबई येथून आलेल्या सहा रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.  त्यानंतर पुन्हा सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. यातील दहा रुग्ण मुंबईवरून तर तीन रुग्ण दिल्ली वरून आलेले आहेत. रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालाने तर जिल्हावासीयांची झोपच उडवली. यामध्ये तब्बल 31 जणांचा अहवाल कोरोना बाधितचा आला.

करुन दाखवलं! चीनमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही 

यात  मुंबई येथून आलेल्या 22, औरंगाबाद चार, रायगड एक, बिदर कर्नाटकवरून आलेल्या एका जणांचा समावेश आहे. हे सर्व हिंगोली तालुक्यातील रहिवासी रुग आहेत. तसेच दोन रुग्ण भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत.  तसेच यामध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, आता एकूण 151 कोरोना बाधित रुग्ण झाले असून, त्यापैकी 89 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता 62 रुग्ण उपचार घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 new Covid-19 cases confirmed in Hingoli dist