Car used in crime
sakal
मानवत - तालुक्यातील लोहरा येथे गुरुवारी सकाळी अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली. दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दत्तात्रय अमृतराव जाधव (वय-50) यांना पाच जणांनी बेदम मारहाण करून कारमध्ये कोंबले आणि भरधाव कारने पळ काढला. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोबाईल लोकेशनचा माग काढत आरोपींचा पाठलाग सुरू केला. अखेर चारठाणा येथील नाकाबंदीत कार पकडून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.