
लातूर : ‘जय जय विठ्ठल रखुमाई’ असा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर, विविध अभंगांचे सादरीकरण अन् पर्यावरणाचा जागर करीत राज्यभरातून आलेल्या तब्बल ५ हजार सायकलपटूंचा सायकल रिंगण सोहळा रविवारी (ता. २२) मोठ्या उत्साहात व दिमाखात झाला. पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर झालेल्या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.