
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन तसेच संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. तरीही काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. नियमांचे उल्लघंन केले नसल्याचे या चालकांकडून दिसून येत होते.
हिंगोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील १४ जणांवर गुरुवारी (ता.दोन) गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असून त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी भाजी, फळांची विक्री न करता तसेच अंतराचा नियम न पाळता गांधी चौकात फळविक्रेत्यांनी विक्री सुरू केली होती.
याप्रकरणी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अब्दुल खय्यूम, शेख शफिक, मोहम्मद रफिक, मोहम्मद इद्रिस, मोहम्मद नाईक, मोहम्मद हरून, अब्दुल करीम (सर्व रा. बागवापुरा, हिंगोली) तसेच ताडपत्री विक्रेते शेख रौफ, मोहम्मद जावेद, शेख शौकत, शेख मुस्ताक, शेख शोएब, संजय लदनिया यासह जिनमाता झेरॉक्स, चौरसिया टीव्ही विक्रेते यांच्यावर नगरपरिषदेचे व्यवस्थापक पंडित मस्के यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कळमनुरीत १४ दुचाकीस्वार जाळ्यात
कळमनुरी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत शहरात शुक्रवारी (ता. तीन) विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या १४ जणांवर पोलिसांनी कारवाई करून दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. तीन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या अस्थापना वगळता सर्व व्यवहार व रस्त्यावरून खासगी वाहन फिरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश दिले आहेत. तरीही शुक्रवारी विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या १४ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिस पथकाने केली कारवाई
दुचाकीवर फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, पोलिस कर्मचारी श्यामराव गुहाडे, शिवाजी पवार, पवन चाटसे, सूर्यकांत भारशंकर, विक्की उरेवार, नामदेव जाधव, रामचंद्र जाधव, गजानन गडदे, साहेबराव गायकवाड, नागोराव व्हडगीर, सुरेश बांगर, रवी बांगर आदींनी ही कारवाई केली आहे.
१२ दुचाकी ताब्यात
यात अब्दुल नसीर, सुभाष जाट, सचिन जाधव, अक्षय सवलके, शेख अरबाज, शिबगत नाईक, खलिद चाऊस, महारुद्र सवणे, सचिन पडोळे, सलमान शेख, साहेबराव राऊत, शेख सलीम (सर्व रा.कळमनुरी) प्रताप भुतनर (रा. भुतनर सावंगी), विजय संत (रा. माळेगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्याकडील १२ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. बंदच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. भोईटे यांनी सांगितले.
येथे क्लिक करा - कळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्थापना
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
सेनगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन तसेच संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारी (ता. एक) कारवाई करण्यात आली. यात विराट लांडगे, अब्दुल रहेमान (दोघे रा. सेनगाव), एकनाथ गिते (रा.नागासिनगी), महादेव जाधव (रा.पानकनेरगाव), जावेद पठाण, दिलीपसिंग सुरेटाक (दोघे रा. सेनगाव) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी केली २५ वाहने जप्त
चारचाकी वाहने फिरविणाऱ्यांत साहेबराव घोंगडे (रा. साळणा ता. औढा), मस्तान चाऊस (रा. नरसी नायगाव), दुकान सुरू ठेवणारे संजय डोईफोडे (रा. कहाकर खुर्द), नंदकिशोर नव्हळ (रा. कोळसा), फळ विक्रेते रामा कोटकर (रा. वरुड चक्रपान), गजानन गव्हाणे (रा. सेनगाव) यांचा समावेश आहे. तसेच विनाकारण वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध शुक्रवारी (ता. दोन) पंचवीस वाहने पोलिसांनी कारवाई करून जप्त केली आहेत. पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव जाधव, अभय माकणे, पोलिस कर्मचारी अनिल भारती, महादू शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे.