Bidkin Crime : JSW कंपनीतील ट्रान्सफॉर्मर फोडून ६०० किलो कॉपर वायरिंग लंपास; तीन चोरटे जेरबंद, पुण्याला विक्रीसाठी नेत असलेला १४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बिडकीन डीएमआयसी परिसरातील JSW कंपनीच्या दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील लाखोंचे कॉपर वायरिंग चोरी करणाऱ्या टोळीचा बिडकीन पोलिसांनी केला पर्दाफाश.
600 kg Copper Wiring Stolen After Breaking Open Transformer at JSW Company Three Thieves Arrested

600 kg Copper Wiring Stolen After Breaking Open Transformer at JSW Company Three Thieves Arrested

sakal

Updated on: 

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - बिडकीन डीएमआयसी परिसरातील JSW कंपनीच्या दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील लाखोंचे कॉपर वायरिंग चोरी करणाऱ्या टोळीचा बिडकीन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल ६०० किलो कॉपर वायरिंग चोरून पुण्याला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. चितेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीच्या कॉपर वायरिंगसह १० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...