esakal | ‘त्या’ महिलेमुळे सेलू व परभणीतील ६१ जण कॉरन्टाईन
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

सेलूतील ‘त्या’ महिलेच्या कुटूंबातील आठ व संपर्कात आलेले २३ व परभणीतील ‘त्या’ रुग्णालयातील एकूण ३० असे एकूण ६१ जणांना जिल्हा प्रसासनाने क्वॉरन्टाईन केले असून त्यांचे स्वॅब घेवून ते औरंगाबादमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत

‘त्या’ महिलेमुळे सेलू व परभणीतील ६१ जण कॉरन्टाईन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : सेलूतील कोरोनाग्रस्त महिला दोन तास परभणी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यामुळे परभणीतील ‘तो’ दवाखानाही महापालिकेच्यावतीने सील करण्यात आला आहे. या महिलेच्या संपर्कात आलेले सेलू व परभणी शहरातील ६१ जणांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब घेवून औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

नांदेड येथील रूग्णालयात उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली सेलूतील ‘ती’ महिला परभणीतही एका खाजगी दवाखान्यामध्ये दोन तास थांबली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. २९ एप्रिल २०२०) रात्री हा दवाखाना सिल केला आहे. या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सेलूतील ‘त्या’ महिलेच्या कुटूंबातील आठ व संपर्कात आलेले २३ व परभणीतील ‘त्या’ रुग्णालयातील एकूण ३० असे एकूण ६१ जणांना जिल्हा प्रसासनाने क्वॉरन्टाईन केले असून त्यांचे स्वॅब घेवून ते औरंगाबादमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.

हेही वाचा - सेलूतील महिलेला कोरोना; नांदेडमध्ये उपचार

मोंढा परिसरातील रस्ते बंद
शहरातील ज्या मोंढा परिसरात हा दवाखाना आहे. अगोदरच परभणीकरांमध्ये कोरोना विषाणुची धास्ती आहे.  अशात सेलूची महिला परभणीमध्ये उपचारासाठी त्या दवाखान्यात आली होती, अशी माहिती महापालिका प्रशासनास मिळाली होती. या माहितीवरून खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा दवाखाना सिल केला आहे. त्याच बरोबर मोंढा परिसरातील रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

अशी आहे हिस्ट्री
गेल्या दोन दिवसांपूर्वीच परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला असतांना बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनासह नागरिकही हादरून गेले आहेत. सेलू येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.

येथे क्लिक करा - व्याकूळ मातेची मुलाशी घडविली भेट

त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. २८ एप्रिल रोजी ही महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. येथील जिल्हा रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी आला असून, ती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली.