esakal | व्याकूळ मातेची मुलाशी घडविली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्वता:च्या वाहनातून सोडले रुग्णालयात; प्रेरणा वरपुडकर यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

व्याकूळ मातेची मुलाशी घडविली भेट

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : पोटच्या गोळ्याला जुलाब होत असल्याने परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यास भेटण्यासाठी जाण्याची इच्छा असतानाही वाहन न मिळाल्याने व्याकूळ होऊन रडू कोसळलेल्या दैठणा येथील एका मातेला स्वतःच्या वाहनात बसवून जिल्हा रुग्णालयात आणून सोडण्याचे काम काँग्रेसच्या नेत्या प्रेरणा वरपुडकर यांनी केले. एवढेच नाही तर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाळाच्या आरोग्याची विचारपूस करून माणुसकीचे दर्शन घडविले.
कोरोनाच्या या संकटकाळात माणुसकीची अनेक उदाहरणे आपण दररोज अनुभवत आहोत. कलयुगात माणुसकीचा अंत होईल, असा दावा केला जात होता. परंतु, मानव जातीवरच संकट आले असतांना माणूस गप्प कसा बसेल. मंगळवारी (ता. २८) काँग्रेसच्या नेत्या प्रेरणा समशेर वरपुडकर या पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयास भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत होत्या. दुपारच्या वेळी दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आढावा घेऊन त्या पुढे निघाल्या होत्या. 


हेही वाचा - ​धक्कादायक ! तलाठ्याला फेकले नदीपात्रात


स्वता:च्या वाहनातून सोडले महिलेला
त्याच वेळी रस्त्याने एक महिला रडत जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने गाडी थांबवून सदर महिलेची विचारपूस केली. या महिलेने आपले बाळ आजारी असून त्याला परभणी येथे घेऊन जाण्यात आले आहे. रुग्णवाहिकेत बाळाची आजी आहे. परंतु, मला जाण्यासाठी वाहनच मिळत नाही, असे सांगून आश्रूला वाट मोकळी करून दिली. एका आईचे हृदय दुसरी आई ओळखणार नसेल तर ती आई कसली. प्रेरणा वरपुडकर यांनी पुढचा दौरा रद्द करून सदर महिलेस स्वतःच्या गाडीत बसविले व सरळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणून माय-लेकराची भेट करून दिली.


हेही वाचा - परभणी जिल्हा परिषदेने दिले तब्बल एक कोटी रुपये..! कशासाठी ते वाचा...
महिलेने मानले आभार
स्वतः मुलाची भेट घेऊन डॉक्टरांची चर्चा करून मुलाची काळजी घेण्याची विनंती केली. या अशा परिस्थितीत प्रेरणा वरपुडकर यांनी दाखविलेली तत्परता व माणुसकीमुळे सदर महिलेने त्यांचे हात जोडून आभार व्यक्त केले.

loading image