COVID-19 : जालन्यात दोघांचा मत्यू, ४९ जण झाले बरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

आज दिवसभरात ६९ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू 

जालना : जालना शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती अधिक वाढली असताना कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मोठ यश आले. सोमवारी (ता. सहा) तब्बल ४९ रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बाधितांमध्ये ६९ जणांची भर पडली असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दहा दिवस लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. रविवारी दिसभरात ४७ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी पुन्हा ६९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रुग्ण जालना शहरातील आहेत. यामध्ये बन्सीपुरा भागातील १४, मिशन हॉस्पिटलमधील चार, जेईएस कॉलेजमध्ये अलगीकरणातील दोन, नवीन बाजार, मंगळबाजार, संभाजीनगर ,पोलास गल्ली येथील प्रत्येकी दोन, पेन्शनपुरा परिसरातील तीन, मोदीखाना भागातील पाच, कादराबादमधील चार, मस्तगडमधील तीन, दुर्गामाता रोड परसिरातील पाच, हॉटेल अंबर परिसर, चौधरीनगर, शाकडनगर, झाशीची राणी चौक परिसर, सहायोगनगर, नाथबाबा गल्ली, दुःखीनगर, कृष्णकुंज, हकीम मोहल्ला, गोपाळपुरा, लक्ष्मीनगर, सकलेचानगर, श्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला

घनसावंगी शहरातील गणपती गल्लीतील एक, बदनापूर येथील एक, अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील चार आणि जालना तालुक्यातील बाजीउमरद येथील एका रुग्णही बाधित आढळून आले आहे. दरम्यान, जालना शहरातील दर्गावेस भागातील ५३ वर्षीय महिलेचा व पेन्शनपुरा परिसरातील ७० वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दोन्ही रुग्ण न्युमोनिया, उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त होत्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जालना शहरात झपाट्याने वाढलेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ८०० झाला असून, त्यापैकी ४६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
 
या भागातील रुग्णांची कोरोनावर मात 
सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या ४९ रुग्णांमध्ये जालना शहरातील मिशन हॉस्पिटल परिसर, व्यंकटेशनगर, संभाजीनगर, पोलिस ऑफीस क्लब, पेन्शनपुरा, बागवान मस्जिद, वसुंधरानगर व बन्सीपुरा रहेमान गल्ली व गोपाळपुरा भागातील प्रत्येकी एक, श्री कॉलनीतील सहा, रहेमानगंज भागातील ११, खडकपुरामधील सहा व्यक्तीचा समावेश आहे. उर्वरितांमध्ये मानेपुरी (ता. घनसावंगी ) येथील एक, धामणी (ता. परतूर) येथील एक, जाफ्राबाद शहरातील एक, टेंभुर्णीतील ११, भोकरदन शहरातील नूतन कॉलनीतील व तालुक्यातील भारज बुद्रुक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 69 new cases of COVID-19 in Jalna District