चाकूर - तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण अडीच महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासनाकडून आता हे आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे नव्याने सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (ता.११) पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढली जाणार आहे. नव्याने काढण्यात येणाऱ्या सोडतीमुळे भावी सरपंचाचा तोरा मात्र उतरला आहे.