Subsidy Distribution Scam : जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सुमारे ७४ अधिकारी निलंबित असून, ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना आजही मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे.
घनसावंगी : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटपात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ७४ अधिकारी-कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.