Phulambri News : 75 टक्के पेक्षा जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

फुलंब्री : "सुजान - मतदार, समृद्ध लोकशाही गौरव" ने सन्मान
75 percent voting where gram panchayat honor voters lok sabha poll 2024
75 percent voting where gram panchayat honor voters lok sabha poll 2024sakal media

Phulambri News : जालना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाने मतदान जनजागृतीत सहभाग घेऊन आपल्या गावात जास्तीत जास्त मतदान करावे. 75 टक्के पेक्षा जास्त मतदान करणाऱ्या गावांचा " सुजान - मतदार, समृद्ध लोकशाही गौरव " ने सन्मान केला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता अधिकारी उषा मोरे शनिवारी (ता.११) रोजी यांनी सांगितले आहे.

याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र दिले आहे. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याची शक्यता निर्माण आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निर्वाचन आयोग, नवी दिल्ली यांचे निर्देशनुसार लोकशाहीमध्ये लोकशाही सदृढ व बळकळ करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे.

ज्या ग्रामपंचायती त्यांच्या कार्यक्षेत्रात 75% पेक्षा जास्त मतदान करतील त्या ग्रामपंचायतीना सुजान मतदार समृध्द लोकशाही ग्रामपंचायत म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज पासून ते मतदानच्या दिवशी पर्यंत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत सर्व मतदाराना मतदान करणे बाबत मंदिर किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या माईक सिस्टीम वरुन सर्व मतदाराना मतदान करणे बाबत आवाहन करण्यात यावे.

तसेच गांवामध्ये दवंडीद्वारे सुध्दा मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांच्या व्हॉट्स अप गृपद्वारे दररोज व्हिडीओ पाठविण्यात यावा, सदर प्रकरणात दिरंगाई होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता अधिकारी उषा मोरे यांनी दिल्या आहे.

लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे. ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीचा " सुजान - मतदार समृद्ध लोकशाही गौरव " ने सन्मान केला जाणार आहे.

- उषा मोरे, आचार संहिता प्रमुख तथा गटविकास अधिकारी फुलंब्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com