Hingoli Floods: औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हिंगोली : येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण भरले असून या धरणाचे आठ दरवाजे ०.३ मीटरने रविवार (ता.१७ ) रोजी सकाळी दहा वाजता उघडण्यात आले आहेत.