esakal | दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

badnapur

दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जालना): सततच्या भिज पावसाने घराची भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकल्या नातीचा मृत्यू झाला आहे. तर तिचे आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील ढासला येथे बुधवारी ( ता. 14) पहाटेच्या सुमारास घडली. श्रावणी मदन सांगोळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती वडीकारळा येथील रहिवाशी असून मागील चार महिन्यांपासून ती आपल्या आजोळी म्हणजे ढासला येथे आजी-आजोबांकडे आली होती.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री भिज पावसाचा जोर वाढल्याने घराची भिंत कोसळून श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिची आजी शांताबाई सारंगधर सोनोने (वय 60) आणि आजोबा सारंगधर विषवनाथ सोनोने (वय 65 दोघे रा. ढासला) असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावातील अशोक नाईक, राजू सोनोने, शिवाजी सोनोने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आजी शांताबाई यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा: 'सुनावणी वेळेत पूर्ण होत नसल्याने कैदी कारागृहात खितपत पडतात'

ढासला गाव सखल भागात असल्याने येथे जोरदार पावसामुळे गावाला वेढा पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या गावातील लोकांना पक्के घरे बांधून देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री, आमदार जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी ग्रामस्थांना दिले होते. मात्र पाच वर्षे उलटून देखील या संदर्भात कुठलीच कार्यवाही न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

loading image