esakal | 'सुनावणी वेळेत पूर्ण होत नसल्याने कैदी कारागृहात खितपत पडतात', मुंबई उच्च न्यायालयाची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

'सुनावणी वेळेत पूर्ण होत नसल्याने कैदी कारागृहात खितपत पडतात'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: खटल्यांची सुनावणी निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे कच्च्या कैद्यांना कारागृहात खितपत रहावे लागते, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीमध्ये व्यक्त केली. दहशतवादी संघटनेचा हस्तक असल्याच्या आरोपात अटकेत असलेला अठ्ठावीस वर्षीय युवक इकबाल अहमद कबीर अहमदच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने याचा निकाल राखून ठेवला. चार वर्षांपूर्वी त्याला दहशतवादी प्रतिबंधक कायद्यासह अन्य आरोपांत अटक करण्यात आली होती. मात्र त्याचा या प्रकरणात संबंध नाही, असा दावा त्याच्या वतीने अॅड. मिहिर देसाई यांनी केला.

पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार परभणीत दहशतवादी हल्याचा कट आखण्यात आला होता. एटीएसने हा कट उधळला आणि आरोपींना अटक केले. मात्र अद्याप खटला सुरू झाला नसून तब्बल दीडशे साक्षीदार आहेत, त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. खटला वेळेत सुरू होत नाही, त्याची कारणे काही असली तरी आरोपींना कारागृहात रहावे लागते, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने मालेगाव बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले.

हेही वाचा: Crop Insurance: मराठवाड्यात अकरा लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

इकबाल अहमद कबीर अहमदच्या विरोधात पुरेसा सबळ पुरावा आहे. तो अन्य आरोपींबरोबर इसिस संघटनेत सामील होणार होता, असा आरोप आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. कदाचित ही फक्त चर्चा असू शकते, गावांमध्ये युवक आणि अन्य लोक गावच्या राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत आणि ट्रम्पवरही चर्चा करतात, असे खंडपीठ म्हणाले.

loading image