Devgaon Rangari Crime : जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू! कुऱ्हाड, लोखंडी रॉडने हल्ला; मुलगा व नातूही जख्मी; दोघांना अटक, अन्य दोघांचा शोध सुरू

माटेगाव येथे जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत ८१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता २०) रात्री घडली.
Gulab Fattu Shaikh

Gulab Fattu Shaikh

sakal

Updated on: 

देवगाव रंगारी - कन्नड तालुक्यातील माटेगाव येथे जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत ८१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता २०) रात्री घडली. गुलाब फत्तु शेख (वय-८१)असे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नांव आहे. या घटनेत मुलगा शेख हिलाल शेख आणि नातूही जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अन्य दोघांच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...