esakal | हिंगोली जिल्ह्यातील १७१ लघु तलावांत ८५ टक्के पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली

काही तलाव हे १०० टक्के भरले असून तर काही तलावात ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे

हिंगोली जिल्ह्यातील १७१ लघु तलावांत ८५ टक्के पाणीसाठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १७१ लघु व मध्यम तलावातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत जिल्ह्यात १७१ गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव निर्माण केले आहेत. यावर्षी सुरवातीला दोन महिन्यात चांगला पाऊस झाल्याने तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असून, जनावरांचा पिण्याच्या व रब्बी हंगामातील पिकांचा प्रश्न मिटला आहे. यातील काही तलाव हे १०० टक्के भरले असून तर काही तलावात ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मध्यंतरी एक महिना पाऊस गायब झाल्याने तलावातील पाणीसाठ्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट झाली आहे.

सेनगाव तालुक्यात एकूण ५३ लघु तलाव असून यामध्ये भानखेडा उपलब्ध पाणीसाठा ९० टक्के आहे. ब्राहमणवाडा ९२ टक्के, पातोंडा ७५ टक्के, बोरखडी १०० टक्के, तर हनकदारी पाझर तलावात ८२ टक्के, गोटेवाडी ६५ टक्के सुकळी खुर्द ६५ टक्के, बाभूळगाव १०० टक्के आदी तलावाचा समावेश आहे. याचप्रमाणे कळमनुरी तालुक्यात ३५ तलाव असून यामध्ये घोळवा सिंचन तलावात ८० टक्के, सुकळी १०० टक्के, माळधावंडा ९० टक्के, मसोड ८० टक्के, कांडली येथे ९५ टक्के तर देववाडी गाव तलाव येथे ८० टक्के, चाफनाथ ८०टक्के, रुद्रवाडी ७५ टक्के आदी तलावांची अशीच परिस्थिती आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात ४० तलावातील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे- गोजेगाव सिंचन तलाव ९५ टक्के, गलांडी ९०टक्के, निशाणा ८५ टक्के, देवाळा ९५ टक्के अंजन वाडा गाव तलावात ९५ टक्के, दरेंगाव ९५ टक्के, लाख, वसई, बेरूला ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील २५ तलावात सरासरी ८५ टक्के पाणीसाठा आजघडीला उपलब्ध आहे. यामध्ये सिंचन तलाव मोप ९०टक्के, माळहिवरा ८५ टक्के, खेरडा ९० टक्के, पाझर तलाव भांडेगाव ८५ टक्के, सावा ९० टक्के, कलगाव, माळशेलू , थोरजवळा ८५ टक्के ,तर गाव तलाव लासीना ,नरसी, बेलुरा पारडी ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याचप्रमाणे वसमत तालुक्यात १८ तलाव असून यामध्ये पांगरा शिंदे मरसुलवाडी, पारडी, गिरगाव या पाझर तलावात ९० टक्के तर वाई, वापटी आदी गाव तलावात ९०टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, २३ ऑगस्ट अखेर सरासरी आजघडीला लघुसिंचन तलावात ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

loading image
go to top