Khamgaon Rain : अतिवृष्टीमुळे खामगाव तालुक्यातील 9 हजार 350 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; 95 गावे बाधित

खामगाव तालुक्यात (Khamgaon Rain) रविवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टीचा प्रकोप झाला आहे.
Khamgaon Rain
Khamgaon Rainesakal
Summary

खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचेच नव्हे, तर नागरिकांचे देखील नुकसान झाले आहे.

-सचिन बोहरपी

खामगाव : खामगाव तालुक्यात (Khamgaon Rain) रविवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टीचा प्रकोप झाला आहे. तालुक्यातील ९५ गावांना याचा फटका बसला असून सोयाबीन, कापूस, तूर, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अंदाजे ७ हजार १६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, नदी, नाल्यांच्या काठची शेत जमीन खरडून गेली आहे.

खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचेच नव्हे, तर नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून अंदाजित नुकसान सांगितले जात आहे. यामध्ये तालुक्यातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर, केळी यांचे नुकसान झाले आहे. तसेच ९५ गावांना याचा फटका बसला आहे. अंदाजित ७ हजार १६० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. या सोबतच नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी शेतात गेल्याने जमीन खरडून गेली आहे.

Khamgaon Rain
'केसरकरांना शिक्षण खाते कळालेच नाही, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका'; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केलीये मागणी?

या अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील ९ हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये खामगाव मंडळातील आवर, पिंपरी, गवळी, नागपूर विहिगांव, रामनगर, मक्ता, रोहना या गावांनाही जास्त फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सध्या पाणी ओसरल्यामुळे आता पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com