

Nine-year-old Vihaan Aspatwar has achieved a FIDE Classical Rating of 1541, becoming the first Under-10 rated chess player from Sindhudurg.
Sakal
देगलूर : मूळ देगलूर येथील आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या अवघ्या नऊ वर्षीय विहान राहुल अस्पतवार याने बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत FIDE क्लासिकल रेटिंग १५४१ प्राप्त केले आहे. या कामगिरीमुळे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंडर-१० गटातील पहिला FIDE आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू ठरला असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.